आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • In The Lockdown, If The Wholesalers Did Not Buy Alphonso, Then The Farmers Created A Network, A Farmer Only Sold 1.5 Lakh Mangoes And Earned Two Crores.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हापुस'ची ऑनलाइन ऑर्डर:लॉकडाउनमुळे थोक विक्रेत्यांनी फिरवली पाठ, शेतकऱ्याने स्वतःचे नेटवर्क बनवून केली 2 कोटी रुपयांची कमाई

औरंगाबाद(महेश जोशी)9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांनी 5 दिवसात डिलीव्हरीची गॅरेंटी दिली, 15 हजार शहरांत माल पोहोचवला

लॉकडाउनमुळे आंब्याची चव चाखता येत नसेल, तर चिंता करू नका. यंदा कोकणातील आंब्याच्या मालकांनी ‘अल्फांसो’ म्हणजेच हापुस आंब्याची ऑनलाइन ऑर्डर आणि होम डिलीव्हरी सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील ठोक विक्रेत्यांनी आंबे खरेदीकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी स्वतःचे नेटवर्क बनवून आंब्याची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. कोकणातील बाग मालक प्रशांत पावळे सांगतात की, ‘आम्ही आमचे नेटवर्क वाढवून शहरात राहणाऱ्यांपर्यंत दोन दिवसात आंब्याची डिलीव्हरी करत आहोत. मी मागील 50 दिवसांत दिड लाख आंबे विकून 2 कोटी रुपयांची कमाई केली.’

प्रशांत पुढे सांगतात की- ‘हाफुसाच्या क्वालिटीमुळे ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवर याला इतर फळाप्रमाणे विकता येत नाही. आम्ही ऑर्डर घेण्याच्या तीन-चार दिवस आधी आंबे पेटीत ठेवून पिकवतो. आम्ही हे आंबे ग्राहकांपर्यंत पोहचवण्यापूर्वी याच्या क्वालिटीवर खास लक्ष्य देतो.’ यावर्षी स्वतःची वेबसाइट बनवून लोकांपर्यंत आंबे पोहचवणारे निखिल खानविल्कर सांगतात की, ‘ग्राहकांना आंब्याच्या क्वालिटीवर संशय येऊ नये, यासाठी आम्ही प्रत्येक आंब्यावर क्यूआर कोडिंग स्टीकर लावत आहोत.’

कोकणात दरवर्षी 2.75 लाख टन हापुस पिकवला जातो

कोकणात दरवर्षी 2.75 लाख टन हापुस आंब्याची लागवड केली जाते. यातील सहा हजार टन आंब्याची निर्यात केली जाते. यावर्षी निर्यात होत नसल्यामुळे आंब्याच्या भावावरही परिणाम पडला आहे. यावर्षी पाच डजन आंबे म्हणजेच 60 आंब्याची पेटी 4,000 रुपयापर्यंत विकली जात आहे. इतर वर्षी हीच पेटी 6 हजार रुपयांपर्यंत विकली जाते.

बातम्या आणखी आहेत...