आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन टॅपिंग:फोन टॅपिंग प्रकरणात अखेर रश्मी शुक्ला यांचा हैदराबाद येथील निवासस्थानी जाऊन नोंदवला जबाब

हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांच्या एका पथकाने हैदराबादमध्ये जाऊन जबाब नोंदवला

फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा अखेर जबाब नोंदवण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलातील सायबर सेलच्या पथकाने रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी जाऊन जबाब नोंदवला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांना सायबर पोलिसांनी समन्स बजावले होते. त्यानंतर करोना महामारीचे कारण देत शुक्ला यांनी चौकशीला येण्यास नकार दिला होता. तसेच, कारवाई टाळण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी कोर्टातही धाव घेतली होती. दोनवेळा रश्मी शुक्ला यांना सायबर सेलचे चौकशीला उपस्थित राहण्यासंदर्भात समन्स बजावला होता.

फोन टॅपिंग प्रकरणात बीकेसी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यासाठी परवानगी दिल्यानंतर सायबर सेलने त्यांचा जबाब नोंदवला आहे मात्र यात त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावल्याची देखील माहिती मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...