आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोलीत बांधावरच्या खत वाटपाचे उदघाटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात, सकाळ पासून ताटकळलेल्या शेतकऱ्यांतून संताप

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बैठकीसाठी बोलावलेले अधिकारीही ताटकळले, बिस्कीट खाऊन शेतकऱ्यांनी भुक भागवली

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना सोशल डिस्टंन्सींग पाळत खते उपलब्ध व्हावीत यासाठी गटामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र या उपक्रमाचे हिंगोलीत पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी (9 एप्रिल) दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात झाले. तर सकाळपासून ताटकळलेल्या शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्हयात आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतकरी गटामार्फत बांधावर खते उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोलीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन देखील केले आहे. त्यासाठी खताची मागणी देखील नोंदविण्यात आली असून हिंगोली जिल्हयासाठी सुमारे 50 हजार मेट्रीक टन खत मंजूर झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात कृषी विभागाकडून 1200 शेतकरी गट तयार केले आहे. या गटामार्फत खत वितरण केले जाणार आहे.

दरम्यान, आज या खत वाटप कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सहा वाजताच शेतकऱ्यांना बोलावले. काही शेतकरी वाहने घेऊन सकाळी आठ वाजता हजर झाले. मात्र दुपार बारा वाजेपर्यंत उदघाटनाच्या कुठल्याही हालचाली नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी राग व्यक्त करून वाहने घरी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विनवणी करून थांबवून घेतले. त्यानंतर दुपारी दोन वाजता या उपक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र बांधावर खत वाटपाच्या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात झाल्याने अनेकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

बिस्कीट खाऊन शेतकऱ्यांनी भुक भागवली

ग्रामीण भागातून सकाळी सहा वाजता हिंगोलीत दाखल झालेल्या शेतकऱ्यांना दुपारी एक वाजेपर्यंत ताटकळत थांबावे लागले. लॉकडाऊनमुळे खाण्यासाठी काहीही नसल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी बिस्कीट खाऊन भुक भागवली.

बैठकीसाठी बोलावलेले अधिकारीही ताटकळले

यावेळी जिल्ह्यातील टंचाई आढावा, खरीप हंगाम नियोजन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे तसेच पुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी आकरा वाजता बैठकीे नियोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता अधिकारी दाखल झाले. मात्र दुपारी तीन वाजे पर्यंत बैठकच सुरु झाली नाही.त्यामुळे काही अधिकाऱ्यांनीही नाराजीचा सुर व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...