आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडगा:शिवसेना निकटवर्तीयांवर आयटी अस्त्र; ठाकरे-परबांशी संबंधित चौघांवर छापे, मुंबई-पुण्यासह राज्यभरात 20 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे

मुंबई, पुणे, नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल कनाळ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आलेले पथक - Divya Marathi
राहुल कनाळ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आलेले पथक

पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाळ, परिवहनमंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम आणि शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम अशा चौघांच्या निवासस्थान, कार्यालयांवर आयकर विभागाच्या मुंबई पथकाने छापे टाकले. पुण्यासह राज्यभर २० ठिकाणी हे धाडसत्र चालले. त्यापैकी १२ ठिकाणे मुंबईतील होती.

मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून शिवसेना मंत्र्यांचे निकटवर्तीय, संघटना पदाधिकारी व मंत्र्यांसोबत व्यावसायिक संबंध असलेल्यांची निवासस्थाने, रेस्टॉरंट्स, फार्महाऊस व बंगला या ठिकाणी आयकर विभागाची पथके दाखल झाली. राहुल कनाळ यांचा वांद्रे येथील बंगला, बँड्रा रेस्टॉरंट, परिवहन उपअधिकारी बजरंग खरमाटे यांचा पुण्यातील ‘युधिराज’ बंगला, प्रथमेश फार्महाऊस यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या शोरूम्स, बांधकाम प्रकल्प यासह वीस ठिकाणी या धाडी घालण्यात आल्या. केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांची तुकडी बंदोबस्ताला घेऊन ही कारवाई करण्यात आली.

... हा राजकीय दबाव, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, महाराष्ट्र झुकणार नाही
हे सारे दबावासाठी सुरू आहे. याआधी पश्चिम बंगाल आणि कर्नाटकातही हेच झाले. महाराष्ट्र झुकणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. - आदित्य ठाकरे, पर्यटन व पर्यावरणमंत्री.

कोण कुणाचे निकटवर्तीय?
संजय कदम
माजी आमदार
परबांचे निकटवर्तीय
सोमय्यांशी वाद

सदानंद कदम
माजी मंत्री रामदास कदमांचे बंधू
मुंबईतील केबल व्यावसायिक, मुलगा हायवेचा संचालक
चित्रपटांचे फायनान्सर

राहुल कनाळ
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय
युवा सेनेचे पदाधिकारी, वांद्र्यात हॉटेल व्यावसायिक
शिर्डी संस्थानचे विश्वस्त म्हणून ४ महिन्यांपूर्वी नियुक्ती
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी आग्रही

बजरंग खरमाटे
परिवहनमंत्री अनिल परब यांचे निटकवर्तीय. मोटार वाहन विभागातील वादग्रस्त अधिकारी
विभागीय चौकशीत निलंबित, शिवसेनेकडे खाते आल्यावर पुनर्वसन
परबांचे “सचिन वाझे’ म्हणून किरीट सोमय्यांच्या रडारवर, सप्टेंबर २०२१ ची सोमय्यांनी आयकर विभागाकडे तक्रार केली होती.

सीमेवरील वाहनांच्या नोंंदणीत गैरव्यवहार होत असल्याबद्दल केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनीही अाॅक्टाेबर २०२० मध्ये यांच्याविरोधात मुख्य सचिवांकडे केली होती तक्रार आयकर विभागाकडे ७५० कोटी बेहिशेबी संपत्तीची सप्टेंबर २०२१ मध्ये सोमय्यांनी तक्रार केली होती.

बातम्या आणखी आहेत...