आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापेमारी:उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का, साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाने टाकल्या धाडी

सातारा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाने मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीमधील नेत्यांवर सातत्याने आरोप करत आहेत. त्यांनी अनेक नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. दरम्यान बुधवारी सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन छापा टाकण्याची कारवाई सुरू आहे. जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवार यांच्यांशी संबंधीत सर्वच ठिकाणांवर छापेमारी केली जात असल्याची माहिती आहे. पवारांशी संबंधीत कारखान्यांच्या संचालकांच्या घरी देखील छापेमारी करण्यात आली. यासोबतच दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...