आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमावली जारी:राज्यातील लॉकडाउनमध्ये 1 जून पर्यंतची वाढ, राज्य सरकारकडून 'ब्रेक द चेन' निर्बंधांची नवीन नियमावली जारी

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ब्रेक द चेनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, सध्या राज्यात जे निर्बंध घालून देण्यात आले आहेत, ते कायम राहतील. या निर्णयाचे परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले असून, आता ब्रेक द चेनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील.

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. अनेक ठिकाणी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. पण, आता हे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवले आहेत. या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक करण्यात आले आहे.

सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हे नियम असतील...

 • किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11
 • दुध संकलन आणि वितरणाला परवानगी
 • एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्याना लोकलने प्रवास करण्याची परवानगी
 • इतर राज्यातून येणाऱ्यांना 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक
 • बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक प्रशासनाकडे निर्णय घेणार
 • दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11
 • भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11
 • कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11
 • पशुखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11
 • बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी 7 ते 11
 • पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11
 • फळे विक्री- सकाळी 7 ते 11
 • अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी 7 ते 11
 • येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी 7 ते 11
बातम्या आणखी आहेत...