आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रीमध्ये महिलांना मोठी भेट:7 महीन्यानंतर 21 ऑक्टोबरपासून महिलांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रीदरम्यान मुंबईतील महिलांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. येत्या 21 ऑक्टोबरपासून सकाळी 11 वाजेपासून मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये महिलांना प्रवास करता येणार आहे. परंतू, महिलांना सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते रात्रीपर्यंत प्रवास करता येईल. कोरोनामुळे लोकल ट्रेन 22 मार्चपासून बंद केल्या होत्या. जुलैअखेर सुरू झालेल्या ट्रेनमध्ये फक्त महत्वाच्या खात्यातील लोकांना प्रवासाची परवानगी देण्यात आली होती.

पीयूष गोयल यांनी ट्वीटवरुन दिली माहिती

सब-अर्बन ट्रेन्समध्ये महिलांना प्रवास करता येईल, ही माहिती स्वतः रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. गोयल म्हणाले,'आम्ही आधीपासूनच यासाठी तयार होतो. महाराष्ट्र सरकारकडून पत्र मिळाल्यानंरच आम्ही महिलांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.' मुंबईत एसी लोकल सर्विसेदेखील सुरू झाली आहे. तर, मोनोरेल सेवा 18 ऑक्टोबर आणि मेट्रो 19 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या.