आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा:साताऱ्यात पुणे-बंगळुरू महामार्गावर जखमी बिबट्यामुळे वाहतूक ठप्प

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वन विभागाने रात्रभर शोधमोहीम राबवली, मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री जखमी अवस्थेतील बिबट्याने ठाण मांडल्यामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. पाचवड फाटा येथे जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला बसलेल्या या बिबट्याने अर्ध्या तासानंतर धूम ठोकली. बिबट्याची माहिती कळल्यानंतर वन विभागाने रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

बिबट्याचे ठसे आढळले

बुधवारी सकाळपासून ही शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. काही ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले असून आगाशिव परिसरात बिबट्याने धूम ठोकली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...