आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंदर:करमाळा तालुक्यातील दोघांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

कंदर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नक्षली, दुर्गम भागात केलेल्या कार्यामुळे पोलिस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर केलेले आहेत. यात करमाळा तालुक्यातील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी सुरवसे व पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटकुळे यांचा समावेश आहे. या दोघांना हे पदक मिळाल्याने त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. दुर्गम व नक्षली भागात उल्लेखनीय सेवा बाजवल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.

करमाळा तालुक्यातील कोंढेज या गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक  शिवाजी  ननवरे यांनी २०१३ च्या सरळ सेवा परीक्षेत यश संपादन करून पोलीस सेवेत प्रवेश केला. एक वर्षाचे नाशिक येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची नेमणूक गडचिरोली विशेष अभियानपथक एटापल्ली तालुक्यातील, भामरागड एरिया या दुर्गम भागात झाली.  तिथे त्यांनी  तीन वर्षे काम पाहिले. 

तिथे त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची, राबविलेल्या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन केंद्र सरकार कडून आंतरिक सुरक्षा सेवा पदक साठी निवड केली आहे. ननवरे यांना याअगोदर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, खडतर सेवा पदक प्राप्त झालेली आहेत.

 गडचिरोली नंतर ननवरे हे लोणी काळभोर या पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. सध्याच्या कोविड १९ च्या काळातही ते दिवस रात्र सेवा बजावत आहेत. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे तेथील आलेल्या अनूभावाबद्दल म्हणाले की, गडचिरोली ही पोस्टिंग नसून संधी आहे. गोरगरीब जनतेला सेवा देण्याची त्यावेळी आम्हाला आमचे पोलीस अधीक्षक  संदीप पाटील यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत राहिलो आणि पुढे सर्व होत गेलं. हे पदक म्हणजे आम्ही तिथं गोरगरीब जनतेची केलेली सेवा त्यांना केलेली मदत ही या कामाची पावती आहे असेही ननवरे म्हणाले. 

    मूळचे सातोली ता करमाळा येथील पोलीस उपनिरीक्षक शंकर महादेव मुटेकर हे बॅच ११० चे असून प्रशिक्षण नंतर त्यांना चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा पोलिस ठाणे या भागात झाली. तिथे त्यांनी सन २०१५ ते २०१९  याकाळात काम कामकाज पाहिले.

तिथे त्यांनी  केलेल्या  कार्याची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयतर्फे कडून आंतरिक सुरक्षा सेवा पदक साठी निवड केली आहे.  चंद्रपूर नंतर ते  महामार्ग पोलिस मदत केद्र इंदापुर जि. पुणे येथे कार्यरत आहेत. या दोघांनाही आंतरिक सुरक्षा सेवा पदक मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...