आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर:अशा रिकामटेकड्या माणसाला नेता म्हणणे हाच मोठा विनोद

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये होणारी सभा वादळी ठरणार आहे. या सभेवर औरंगाबादचे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. पैसे देऊन राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमवली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. खैरे यांच्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. राजसाहेबांच्या सभेनंतर चंद्रकांत खैरे यांची टिवटिव बंद होईल आणि ते अज्ञातवासात निघून जातील, अशी टीका मनसे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे.

राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद मध्ये गर्दी होणार नाही, असा दावा खैरे यांनी आधी केला होता. तर आता पैसे देऊन राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमेय खोपकर यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोपकर यांनी खैरे यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, 'चंद्रकांत खैरे हे स्वतःच्याच पक्षात अडगळीत गेलेले नेते आहेत. अशा रिकामटेकड्या माणसाला नेता म्हणणं हाच मोठा विनोद आहे. आजच्या राजसाहेबांच्या सभेनंतर चंद्रकांत खैरे यांची टिवटिव बंद होईल, आणि ते अज्ञातवासात निघून जातील, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो.'

बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेशी तुलना

शिवसेनेच्या स्थापनेनंतर स्व. बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये मोठी सभा झाली होती. राज ठाकरे यांच्या सभेची तुलना बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची करण्यात येत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेच्या सभेला होणारी गर्दी पाहता, महाविकास आघाडी मधील सर्वच नेते राज ठाकरेंवर टीका करत आहे. त्यामुळे राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत आघाडी सरकारवर कोणती तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...