आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रतिक्रिया:एकनात खडसे भाजपमधून जाणे महत्त्वाचे आहे, मग ते कोणत्याही पक्षात गेले तरी आनंदच- गुलाबराव पाटील

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपल्या सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यातय आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी खडसेंच्या भाजप सोडण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'खडसे भाजपमधून जाणे महत्त्वाचे आहेत. मग ते कोणत्याही पक्षात गेले तरी आनंदच आहे', अशी प्रतिक्रिया पाटलांनी जळगावातील अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, 'एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. 30 वर्षे आमदार राहिले आहेत आणि लीडर म्हणून त्यांची पत आहेच. ते शिवसेनेत आले, राष्ट्रवादी गेले किंवा काँग्रेसमध्ये गेले तरी आम्हाला आनंद आहे. फक्त त्यांनी भाजपमधून जाणे महत्वाचे आहे,' असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.