आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती राजवट:महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे सोपे नाही, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा विरोधकांना टोला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आधी उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी लागेल'

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी विरोधकांकडून अनेकदा मागणी होताना दिसते. पण, यावर आता राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रपती राजवट लागू करायचीच झाली तर आधी उत्तर प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यात लावावी लागेल. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे इतके सोपे नाही', असे जयंत पाटील म्हणाले.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मासा पाण्याबाहेर काढल्यावर जसा तडफडतो, तशीच अवस्था सत्तेच्या बाहेर पडलेल्यांची झाली आहे. त्यामुळेच ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतात. राज्यात कधी राष्ट्रपती राजवट लागू होते आणि कधी आम्ही सत्तेत येतो असे विरोधकांना झाले आहे. राष्ट्रपती राजवट लागूच करायची असेल, तर आधी उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये लावावी लागेल. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे इतके सोपे नाही', असे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...