आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा निर्वाळा:पादचाऱ्याच्या चुकीने अपघात झाल्यास चालकाची चूक नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघात प्रकरणात महिला आरोपोची निर्दोष सुटका

रस्ते अपघात प्रकरणात मुंबईच्या दादर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला अाहे. दंडाधिकारी न्यायालयाचे न्या. प्रवीण पी. देशमाने यांनी रस्त्यावरून चालताना किंवा ताे अाेलांडताना सावधगिरी बाळगणे पादचाऱ्याचे कर्तव्य अाहे. त्याच्या बेजबाबदारपणामुळे अपघात झाला तर त्यासाठी वाहन चालवणाऱ्याला दाेषी मानता येणार नाही असा निकाल दिला. त्यामुळे ५६ वर्षांच्या एका महिला व्यावसायिकेची पाच वर्षांपूर्वीच्या रस्ते अपघात प्रकरणातून निर्दाेष सुटका झाली अाहे.

२० अाॅक्टाेबर २०१५ राेजी ही महिला पायी अाॅफिसला जात असताना पारसी अग्यारीच्या जवळ मागून येणाऱ्या कारने तिला धडक दिली. त्यामुळे महिला जमिनीवर पडली अाणि कारचे मागचे टायर तिच्या पायावरून गेले. ही कार एक महिला व्यावसायिक चालवत हाेती. अपघात हाेताच तिने कार थांबवली देखील हाेती. दुसऱ्या दिवशी जखमी महिलेच्या वडिलांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. काही अाठवड्यांनी जखमी महिलेचा जबाब नाेंदवून केस दाखल करण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...