आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणे रिफायनरी प्रकल्पाचे दलाल:खा. विनायक राऊतांचा घणाघात, रत्नागिरीत ग्रामस्थांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरीतील बारसू आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या 5 गावांचा रिफायनरी प्रकल्पाला 100 टक्के विरोध आहे. परंतु रिफायनरीचे जे दलाल आहेत ते याठिकाणी जात आहेत. प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्यांना धाक दाखवून दडपशाही करुन पोलिसांची दादागिरी सुरु आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर केली.

बारसूमधील प्रस्तावित रिफायनली प्रकल्पाच्या जागेला आज निलेश राणे यांनी भेट दिली. त्यावर खा. विनायक राऊत म्हणाले, सरकार रिफायनरीच्या दलालांकडून विरोध करत असलेल्या ग्रामस्थांवर अत्याचार करत आहे. शिवसेना लवकरच याबाबत भूमिका घेणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

निलेश राणेंना विरोध

नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्यास नाणारवासियांनी विरोध केला होता. प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासीयांनी मोठे आंदोलन उभारले होते. आता राज्यात झालेल्या सत्तातरानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पाचे काम रत्नागिरीतील बारसू याठिकाणी सुरु झाले आहे. खासदार निलेश राणे यांनी प्रस्तावित जागेला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवत विरोध केला. संतापलेल्या ग्रामस्थांनी निलेश राणेंचे ऐकूनही घेतले नाही. यानंतर आता शिवसेनेच्या गोट्यातून याबाबत तीव्र स्वरुपाची प्रतिक्रीया उमटत आहेत.

ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्या

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, बारसूच्या आसपासच्या 6 गावांचा या प्रकल्पाला विरोध आहे. येथील 450 लोकांवर तडीपारीच्या नोटीसा लावण्यात आल्या आहेत. याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या घरादारावर अशाप्रकारे नांगर फिरवून हा प्रकल्प राबवता येणार नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या.

सामंत गद्दार गटाचे

पुढे राऊत म्हणाले, आत्ताचे राज्यकर्ते रिफायनरीचे दलाल आहेत. मग ते केंद्रातले असो किंवा राज्यातले ते रिफायनरीचे समर्थक आहेत. किंबहुना दलाल आहेत. 224 गुजराती-मारवाडी लोकांनी त्या 6 गावातील जमिनी कवडीमोल भावात विकत घेतल्या. त्यामुळे ही रिफायनरी देशाच्या हितासाठी नव्हे तर भूमाफियांच्या हिताची आहे. एका प्रश्नाला उत्तर देतांना सामंत हे गद्दार गटाचे असल्याचा पुनरुच्चार करत आम्हीच खरे शिवसेनेचे आहोत. असेही राऊत म्हणाले. उद्योगमंत्री या नात्याने सामंतांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायाला हवे. असा सल्लाही त्यांनी दिला.

ठाकरे निर्णय घेतील

उद्या रिफायनरी प्रकल्पाबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या आदेशानंतर पुढचे पाऊल उचलू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...