आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jayant Patil ED Interrogation Update; IL & FS Money Laundering Case | NCP Leader | Jayant Patil

सवलत:जयंत पाटलांनी ईडीकडे मागितली 10 दिवसांची मुदत; कौटुंबिक विवाहसोहळ्याचे दिले कारण, IL&FS चे प्रकरण

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) IL&FS प्रकरणी समन्स बजावले होते. एजन्सीने त्यांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते.

मात्र पाटील यांनी ईडीला पत्र लिहून 10 दिवसांची मुदत मागितली आहे. त्यांनी कौटुंबिक विवाहसोहळ्याला जावे लागणार असल्याचा उल्लेख आपल्या पत्रात केला आहे. विशेष म्हणजे पाटील यांना त्यांची चौकशी करण्यासाठी दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते.

माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही- पाटील यांचा दावा

जयंत पाटील म्हणाले की, मला ईडीची नोटीस मिळाली आहे, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, मी त्यांच्याकडून कोणतेही कर्ज घेतले नव्हते. मी तपासात सहकार्य करेन. त्यांनी एजन्सीला पत्र लिहून सांगितले की, मला काही कौटुंबिक विवाहसोहळ्यांना हजेरी लावायची आहे.

जयंत पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. या प्रकरणी कोहिनूर कन्स्ट्रक्शनला दिलेल्या कर्जासंदर्भातही एजन्सीने राज ठाकरे यांची देखील चौकशी केली आहे.

ईडीने 10 मे रोजीच बीएसआर अँड असोसिएट्स आणि डेलॉइट हॅस्किन्स अँड सेल्स या दोन माजी ऑडिटर फर्मच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. एजन्सीने पीएमएलएच्या तरतुदींनुसार दोन्ही कंपन्यांवर हे छापे टाकत मोहीम राबवली होती. एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिमेदरम्यान अनेक कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

हे छायाचित्र 2019 चे आहे, जेव्हा राज ठाकरे यांना IL&FS प्रकरणात ED ने चौकशीसाठी बोलावले होते.
हे छायाचित्र 2019 चे आहे, जेव्हा राज ठाकरे यांना IL&FS प्रकरणात ED ने चौकशीसाठी बोलावले होते.

ED च्या सूत्रांनी सांगितले की, IL&FS मध्ये कथित घोटाळा आणि मनी लाँड्रिंगचे प्रकरण 2019 मध्ये उघडकीस आले होते. प्रथम स्थानिक स्तरावर तपास करण्यात आला, ज्यामध्ये सापडलेल्या तथ्यांच्या आधारे ईडीने 2019 मध्येच तपास सुरू केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने IL&FS समूहाच्या कंपन्या IRL, ITNL आणि या कंपन्यांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

राज ठाकरे कोहिनूर सीटीएनएलमध्ये होते भागीदार

IL&FS ने कोहिनूर CTNL ला कर्ज दिले होते आणि इक्विटी गुंतवणूक देखील केली होती. सीटीएनएलने कर्ज भरण्यात चूक केली आहे. राज ठाकरे हे देखील CTNL मध्ये भागीदार होते. मात्र, नंतर त्याचे शेअर्स विकून ते बाहेर पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज ठाकरे यांनी त्याच वर्षी शेअर्स विकले जेव्हा IL&FS ने CTNL चे शेअर्स तोट्यात विकले.