आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हणून गृहमंत्रीपद नको:मला डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचा त्रास सुरु करून घ्यायचा नाही, असे म्हणत जयंत पाटलांनी सांगितला गृहमंत्री पदाचा अनोखा किस्सा

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गृहमंत्री पदाबाबत एक अनोखा किस्सा सुनावला आहे. मला आता ब्लड प्रेशरचा त्रास मागे लावायला नाही. त्यामुळे मला गृहमंत्री बनायची इच्छा नाही. अशा स्पष्ट शब्दात जयंत पाटील यांनी गृहखाते नाकारले आहे. सांगलीमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पाटील सांगलीत आले होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांना गृहमंत्री पदाबाबत विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

असा सांगितला किस्सा

2009 साली आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद तुम्हाला संभाळायचे आहे, असे मला पक्षाकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी एका लग्नात आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री खात्यांची संकल्पना नेमकी कशी असते हे सांगितले होते. तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? याची आबांनी मला विचारणा केली होती.

मी नाही म्हटल्यानंतर मग तुम्ही गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील. असे मिश्कीलपणे सांगितले होते. गृहमंत्री झाल्यानंतर मला ब्लड प्रेशरचा त्रास देखील सुरु झाला. आणि माझ्या खाजगी सचिवाला देखील तोच त्रास सुरु झाला होता. पण आता हा डायबिटीसचा त्रास मला मागे लावून घ्यायचा नाही. असे माझे मत आहे. अशा स्पष्ट शब्दात जयंत पाटलांना गृहखाते नकारले आहे.

बातम्या आणखी आहेत...