आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणत आहेत. मात्र, त्यांच्या पुन्हा येईनची चिंता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 वीरांनी करावी, अशी टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अखेर पवारांनी राजीनामा मागे घेऊन आपल्या नेत्यांना दिलासा दिला. त्यानंतर जयंत पाटील पुन्हा आक्रमक झालेले दिसत आहेत.
देवेंद्र फडणवीस कर्नाटक दौऱ्यावर होते. या काळातच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या निट्टूरमध्ये हजेरी लावली. येथे त्यांनी तुफान फटकेबाजी केली. आपले कुलदैवत नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो. मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. मी कसा येतो, हे तुम्हाला देखील माहिती आहे, असे म्हणत धमाल उडवून दिली होती.
फडणवीस यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत जयंत पाटील म्हणाले की, त्यांची भीती आम्हाला नाही. त्याची भीती एकनाथ शिंदे यांना असली पाहिजे. पुन्हा येईन म्हणतात. ते आलेलेच आहेत. दोन नंबरला बसलेले आहेत. मी पुन्हा येईन म्हणतायत म्हटल्यावर एकनाथ शिंदेंना बाजूला ढकलून ते आता मुख्यमंत्री पदावर बसत असतील, तर त्याची चिंता एकनाथ शिदेंनी केली पाहिजे. एकनाथ शिंदेंसोबत जे चाळीस वीर गेलेले आहेत. त्या सळ्यांनी चिंता केली पाहिजे.
महाविकास आघाडीचा चांगल्या कामांना विरोध नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवीन उद्योग, रोजगार यावा. मात्र, केंद्राच्या कामगार कायद्यामुळे कामगारांना संरक्षण उरले नाही. बारसूमध्ये शेती, शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, हा विश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
संबंधित वृत्तः
मी पुन्हा येईन म्हटले की येतोच, कसा येतो हे तुम्हाला माहिती; फडणवीसांच्या वक्तव्याने पिकला एकच हशा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.