आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट मुद्याचे:शरद पवारांनीच अध्यक्षपदी का, कधीपर्यंत रहावे? जयंत पाटील यांनी सांगितली ठोस कारणे, आता निर्णयाची प्रतीक्षा!

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांनीच रहावे, अशी देशातल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याची ठोस कारणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. आम्ही सर्व एकच आहोत. कोणाचे नेतृत्व मान्य-अमान्य करण्याचा प्रश्नच नाही. सकाळी मुंबईत कुठलिही बैठक झाली नाही. आता सायंकाळी पाचच्या सुमारास होणाऱ्या बैठकीला मी जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला जयंत पाटील यांना बोलावले नाही, अशा बातम्या आल्या. मात्र, याचे पाटील यांनी खंडण केले. शिवाय सारे खापर माध्यमांवर फोडले. उन्हामुळे वज्रमूठ सभेच्या तारखा बदलण्याचा निर्णय एक तारखेलाच अनौपचारिक चर्चेत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मुनगंटीवारांचा तोल का जातो?

जे पद अस्तित्वाच नाही. त्या पदाचा राजीनामा दिला म्हणजे काय वेगळे केले, असे सुधीर मुनगंटीवाराचे म्हणणे आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, मुनगंटीवारांचा तोल वारंवार का जातो. गेल्या चार दिवसांत त्यांची विधाने पाहिली, तर त्या विधानाबद्दल राष्ट्रवादीबद्दल प्रचंड तिरस्कार दिसतोय. ते चुकीचे विधाने करत आहेत. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना मानणारे देशात, राज्याच्या विविध भागात आहेत. आम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. ती औपचारिकता आहे.

स्वतःहून निर्णय घेतला

जयंत पाटील म्हणाले की, देशातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना अध्यक्षपदी शरद पवार हवे आहेत. त्यांच्या राजीनाम्यावर समिती नेमलीय. ती योग्य निर्णय घेईल. त्यांनी कालच अचानक राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे चर्चा मसलत करायला वेळ मिळाला नाही. चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचे कारण कळले नाही. त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

निर्णय बदलावा

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांच्या नेतृत्वामुळे देशात पक्ष वाढला. त्यांच्यामुळे कार्यकर्ते जोडले. ते बाजूला जाणे ही पक्षाची मोठी हाणी आहे. याबद्दल कोणाच्याही मनात वेगळा विचार येऊ शकत नाही. त्यांनी निर्णय बदलावा, अशी सगळ्यांची मागणी आहे. शरद पवारांनीच अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

फक्त दीड वर्ष

जयंत पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी फक्त दीड वर्षाचा कालखंड आहे. त्यामुळे सर्वांनाच वाटते की, त्यांनी तोपर्यंत तरी पदावर रहावे. नवा अध्यक्ष कोण, कसा काम करतो हे आत्ताच सांगणे योग्य नाही. माझ्याबाबत म्हणाल, तर मी राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी स्वतःला लायक समजत नाही. मला राज्यातच काम करायचे आहे. पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असेल. आम्ही सगळे एकत्रितच आहोत. कोण कोणाचे नेतृत्व मान्य-अमान्य करण्याचा प्रश्नच नाही.

सायंकाळी होणार बैठक

जयंत पाटील म्हणाले की, मला तुम्हीच विचारले की, मुंबईतल्या बैठकीला का गेला नाहीत. मी सांगितले, मला कोणतीही माहिती मिळाली नाही. तुम्ही मला प्रश्न विचारला बैठकीला बोलावले नाही का. मी उत्तर दिले, कदाचित आवश्यकता वाटली नसेल. प्रत्येक बैठकीला बोलावले पाहिजे असा आग्रह नसावा. मी आत गेल्यानंतर माझे सुप्रियाताईंचे बोलणे झाले. मी चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, कुठलीही बैठक झालेली नाही. बोलावण्यात आलेली नाही. संध्याकाळी पाच वाजता बैठक आहे. त्याबद्दल पवार साहेबांशी माझे बोलणे झाले. त्या बैठकीला मी पोहचणार आहे.

संबंधित वृत्तः

भाकरी फिरवणार:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त; स्वत: केली घोषणा, यापुढे निवडणूकही लढवणार नाही

82 वर्षांच्या शरद पवारांनी NCP चे अध्यक्षपद सोडले, कार्यकर्ते नाराज; अजितदादा म्हणाले - फेरविचारासाठी साहेबांनी मागितला वेळ

लोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन