आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • JEE Exam From Tomorrow, Admission After Thermal Screening, Instruction To Parents Not To Stop Outside After Leaving Children At The Examination Center

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून जेईई मेन्स परीक्षा:थर्मल स्क्रीनिंग नंतर प्रवेश, पालकांना परीक्षा केंद्रावर मुलांना सोडल्यावर बाहेर न थांबण्याच्या सूचना

3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) बहुचर्चित जेईई मेन्स परीक्षा आज मंगळवार दि. १ सप्टेंबर पासून ऑनलाइन पद्धतीने सुरु होत आहे. ६ सप्टेंबर पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी ७:३० वाजेपासून केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. सुरुक्षेसाठी खबरदारी घेण्यात येत असून, विद्यार्थ्यांना मास्क, हँग्लोजचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडवण्यासाठी पालक येतात. कोरोनामुळे फिजिकल आणि सोशल डिस्टन्सचे पालन करण्यास सांगण्यात आले असून, परीक्षा केंद्रावर पाल्यास सोडल्यानंतर केंद्राबाहेर उभे न राहण्याच्या सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील २३ शहरांमध्ये या परीक्षेसाठी केंद्र देण्यात आले आहे.औंरगाबादमधून एकूण १२००० विद्यार्थी हे ४ केंद्रावर देणार आहेत.

सुरक्षेसाठी असे आहेत उपाय

दरम्यान विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने थर्मल गनद्वारे स्क्रीनिंग केल्यावर आत प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना थ्री लेअर मास्कही देण्यात येणार असून, विद्यार्थी सॅनिटायझरची ५० एमएल बॉटल परीक्षा केंद्रात सोबत ठेवू शकतील. बसण्याची जागा, मॉनिटर किबोर्ड, माऊस, वेब कॅमेरा, डेस्क, खुर्ची प्रत्येक शिफ्टमध्ये सॅनिटाइज केला जाईल.