आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र आव्हाड यांचा टीकाकारांना इशारा:अजित पवार यांचा विरोध करणाऱ्यांनी गोळवलकरांचा धिक्कार करून दाखवावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी राजेंच्या नाजूक इतिहासात जाऊ नका नाही तर मोठा‌ वाद निर्माण होईल. सावरकर आणि गोळवलकर यांच्या दृष्टीने संभाजी महाराज स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. आता भाजप याला कसे प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होत. त्यावरून त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. आता राष्ट्रवादीकडूनही अजित पवारांची पाठराखण केली जात आहे.

कोणी बोलेल ह्याच्या वर?

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट करून खळबळजनक दावा केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका मराठी आणि इंग्रजी पुस्तकांची दोन पानेही आव्हाड यांनी ट्विट केली आहेत. ट्विटमध्ये ते म्हणाले, 'सावरकरांनी व माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी ह्यांच्या बद्दल काय लिहून ठेवले ते वाचा. ह्या शूर विरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले. सावरकर आणि गोळवळकरांच्या दृष्टींनी संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते. कोणी बोलेल ह्याच्या वर'?

चुकीचा इतिहास बिंबवला

जितेंद्र आव्हाड याबाबत मिडीयाशी बोलताना म्हणाले, स्वराज्य रक्षक म्हणजे धर्माचं रक्षण होईलच ना. जे हरहर महादेव चित्रपटाचे समर्थन करताय, जेम्स लेनला ज्यांनी पाठिंबा दिला त्यांनी आम्हाला संभाजी महाराज, शिवाजी महाराजांविषयी शिकवू नये. आधी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं दाखवलं गेल. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनाही शिवाजी महाराजांच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला गेला.

जे अजित पवारांच्या विरोधात बोलताय त्यांनी सांगावे की, गोळवलकरांचा आम्ही धिक्कार करतो. त्यांचे पुस्तक जाळून टाकतो. त्यावर बंदी आणतो. मग तुम्हाला जे बोलायच ते बोला. असे आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...