आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:मराठा आरक्षण प्रश्‍नावर मराठा शिवसैनिक सेनेचे जोडेमारो आंदोलन, अचानक आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षण प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयात योग्य भुमीका मांडली नसल्याचा आरोप करून मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने शनिवारी ता. १५ सकाळी आकरा वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे हिंगोली शहर पोलिसांची धावपळ झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

येथील महात्मा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनात मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांच्यासह पप्पू चव्हाण, पिंटू जाधव, संदीप डांगे, प्रा. बळीराम कल्याणकर, प्रा. विठ्ठल अंभोरे, ॲड. रमेश शिंदे, मधुकर ढवळे, असीफ पठाण, राजू पाटील, शुभम राजे, विश्‍वंभर पटवेकर, सोनू डांगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सर्वाजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सर्वोच्य न्यायालयात बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडले आहे. राज्य शासनाने योग्य बाजू मांडली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे विनायक भिसे पाटील यांनी सांगतिले. मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असून यापुढे आणखी आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही भिसे पाटील यांनी यावेळी दिला.

दरम्यान, आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक नितीन केनेकर, साईनाथ अनमोड, जमादार शेख शकील, सुधीर ठेंबरे, गजानन होळकर, दिलीप बांगर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात स्थानबध्द केले आहे.

बातम्या आणखी आहेत...