आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबरी निकाल:न्यायाचा विजय झाला; अयोध्या निकालावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रीया

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ.मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करीत आहे. या खटल्यात न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ.कालिदास कोळंबकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, अयोध्येतील वादग्रस्त वास्तू बाबत जनतेच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला राग उफाळून आला. त्या वेळच्या काँग्रेस सरकारने लालकृष्ण अडवाणी, डॉ.जोशी, उमा भारती आदी नेत्यांवर खटले दाखल केले. वर्षांनुवर्षे हा खटला चालला. आता सर्वोच्च न्यायालयाने या सर्व नेत्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.भारतीय जनता पार्टीने कायमच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला आहे. या निकालाने न्यायाचा विजय झाला, असेही पाटील यांनी नमूद केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser