आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड:खुनी हल्ल्याचे गोवा कनेक्शन, आमदार नितेश राणेंना घेऊन कणकवली पोलिस गोव्यात

रायगड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार नितेश राणे यांना घेऊन कणकवली पोलिस गोव्याला गेले आहेत, तर त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांची स्वतंत्र चौकशी झाल्यानंतर राकेश परब यांना घेऊन कणकवली पोलिस मालवणला रवाना झाले.

राकेश परब हे आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहायक असून संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित आरोपी आहेत. नितेश राणे यांना घेऊन कणकवली पोलिस निघाल्यानंतर एक तासाने राकेश परब यांना बाहेर काढण्यात आले. जवळपास ५ तास नितेश राणे यांची चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना गोव्याला नेण्यात आले. गुरुवारी नितेश राणे आणि राकेश परब यांची कणकवली पोलिसांनी समोरासमोर चौकशी केली. त्यानंतर राणे यांना गोव्याकडे नेण्यात आले.

काही दिवसांपूर्वी राणे यांनी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर ते गोव्यात वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्यांना गोव्याकडे नेण्यात आले आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांचे उदाहरण देत केलेले ट्विट त्यांनी डिलिट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...