आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Karuna Sharma Hold A Meeting At Bhagwan Gad | Said I Am Daughter in law Of The Vanjari Community | Possibility Of A Dispute

करुणा मुंडे भगवान गडावर घेणार दसरा मेळावा:म्हणाल्या - मी वंजारी समाजाची सून, माझ्या नावाला लोक घाबरतात

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा वाद सुरू असताना आता करुणा मुंडे यांनी देखील भगवान गडावर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

मी वंजारी समाजाची सून असल्याने मेळावा घेऊ शकते असेही त्यांनी म्हटलेय. त्यामुळे या मेळाव्याचा वादही पेटण्याची शक्यताय.

नामदेव शास्त्रींची भेट घेणार

करुणा मुंडे म्हणाल्या की, मी लवकरच दसरा मेळावा घेणार आहे. दसऱ्याला माझी मुलगी शिवानीचा वाढदिवसही असतो. शेतकरी संघटनांना सोबत घेऊन हा मेळावा घेणार आहे. यात अतुल खोपसे, विष्णू कसबे माझ्यासोबत असणार आहेत. लवकरच नामदेवशास्त्रींची याबाबत परवानगी मिळवण्यासाठी भेट घेणार आहे. 5-6 दिवसात त्यांची भेट घेईल. असेही त्या म्हणाल्या.

जनता समजूतदार

करुणा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्राची जनता समजूतदार आहे. मी एक सामान्य महिला नसून संघर्षवादी महिला आहे. त्यामुळे मला भगवान गड, भगवानबाबा, नामदेवशास्त्रीं यांच्यावर विश्वास आहे. मुंडे घराण्याच्या सुपूत्र सुशील मुंडे देखील याठिकाणी येणार आहे.

मी रणरागिणी

करुणा शर्मा म्हणाल्या की, मी महाराष्ट्राची अशी रणरागिणी आहे की माझे नाव घेताच लोक घाबरतात. परंतु मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते की, त्यांनी माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली. एकनाथ शिंदे हेच खरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या रेसमध्ये आता मी पण उतरली आहे. मी पण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे.

भगवानगडाची मोठी परंपरा

भगवान गडावरील मेळाव्याला 50 वर्षाची परंपरा आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता.

मेळाव्याचा वाद

मुंडे यांच्या निधानानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र, 2016 मध्ये गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिला. त्यानंतरही पंकजा यांनी पाथर्डी येथील भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केले. 2017 मध्ये दसरा मेळावा कुठे घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी म्हणजे पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. आता करुणा यांना नामदेव शास्त्री परवानगी देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...