आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्युत्तर:'फ्रॉड या शब्दऐवजी किरीट सोमय्या म्हटलं तरी फ्रॉड असे म्हणायचं आहे हे कळते'- किशोरी पेडणेकर

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्यासह मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. याबाबत एका वृत्त वाहिनीशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना महाभारतामधील 'शिखंडी'ची उपमा दिली आहे.

यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 'महाभारतात किंवा रामायणात असे काही चांगल्या भूमिका होत्या शिखंडीसारख्या. त्यामुळे अशा लोकांना किती मनावर घ्यावं? किंवा त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हा प्रश्नच आहे. किरीट सोमय्यांनी आरोप केला म्हणजे, मी आरोपी होत नाही. कारण आरोप करणे सोपे आहे, पण ते सिद्ध करावेत. सोमय्यांना फक्त आरोप करण्याच्या कामासाठीच नेमले आहे. बऱ्याचदा फ्रॉड हा शब्द उच्चारला नाही, केवळ किरीट सोमय्या म्हटलं तरी फ्रॉड असे म्हणायचं आहे हे कळंत,' असा घणाघात पेडणेकर यांनी केला.

किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याची तक्रार करूनही पालिका आयुक्त आणि ठाकरे सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याने महापौरांची चौकशी करून पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती. तसेच, काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली असल्याचे किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...