आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनंजय मुंडे अडचणीत ?:प्रतिज्ञापत्रात दोन बायका आणि मुलांची माहिती लपवली, किरीट सोमय्या यांची थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. यावरुन विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर, मुंडे यांची थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 'महाराष्ट्रातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी, मुले आणि मालमत्तांबद्दल तथ्ये लपविल्याप्रकरणी आणि महत्त्वाची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी मी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे', असे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.

12 जानेवारीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ उडाली. धनंजय मुंडेंवर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माची बहीण करुणा शर्मा हिच्यासोबत परस्पर सहमतीने संबंधात होतो, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचे पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे,' असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये खुलासा केला होता.

दरम्यान, 'स्वतः धनंजय मुंडे यांनी सार्वजनिकरीत्या दोन लग्न केल्याचे आणि दोन्ही बायका आणि मुलांची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले आहे. तसेच दोन्ही बायकांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याचे कबूल केले आहे. परंतू, ऑक्टोबर 2019मध्ये निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन बायका आणि मुलांची माहिती लपवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी,' अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...