आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्याच्या दप्तरात पाठ्यपुस्तकांऐवजी खंजीर अन् एअर गन आढळल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. शहरातील एका नामवंत शाळेत हा प्रकार घडला. यामुळे महाराष्ट्राचा बिहार होतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
यासंबंधी एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नांदेड शहरातील गुन्हेगारीत सध्या कमालीची वाढ झाली आहे. येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या एका गटाच्या दप्तरात खंजीर असल्यामुळे दुसऱ्या गटानेही खंजीर विकत घतेले नाही. एवढेच नाही तर एका गटातील एका विद्यार्थ्याने पालकांनी खाउला दिलेले पैसे गोळा करून छऱ्यांची एअर गन विकत घेतली. हा विद्यार्थी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने या बंदुकीच्या जोरावर शाळेत दादागिरीही चावली.
...अन् शालेय प्रशासनाला बसला धक्का
विद्यार्थ्यांच्या हातात छऱ्यांची बंदूक व खंजीर आल्याचे कळताच शालेय प्रशासनाला जबर धक्का बसला. प्रशासनाने तत्काळ त्याची माहिती पालकांना देऊन त्यांना शाळेत बोलावून घेतले. त्यानंतर शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकूण पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली.
शिक्षकांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
या प्रकरणी शिक्षकांनी अधिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले. या विद्यार्थ्यांनी अवघ्या 100 रुपयांत खंजीर विकत घेतले होते. त्यानंतर 3 हजार रुपयांमध्ये छऱ्याची बंदूक खरेदी केली. शाळेत आपला दरारा निर्माण करण्यासाठी ही मुले दररोज शाळेत या वस्तू आणत होते. यातील बहुतांश विद्यार्थी सुशिक्षित कुटुंबातील असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे शहरातील उच्चभ्रूंची शाळा म्हणून परिचित असणाऱ्या शाळेत हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
देशी कट्टा घेण्यापूर्वीच बिंग फुटले
उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेत टोळक्याने राहणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 1 हजार रुपये जमा करून आपल्या एका वर्गमित्राला वाढदिवसानिमित्त 15 हजार रुपयांचा देशी कट्टा गिफ्ट म्हणून देण्याचीही योजना आखली होती. यासाठी त्यांनी पैशांची जुळवाजुळवही केली होती. पण तत्पूर्वी या प्रकाराची माहिती शिक्षकांना मिळाली आणि त्यांचा कट फसला.
दिव्य मराठीच्या इतर बातम्या वाचा...
खळबळजनक:नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात आढळला महिलेचा मृतदेह; तोंडातून रक्तस्त्राव, घातपाताचा संशय
नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात महिलेचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. ही महिला सुई-धागा विकून उदरनिर्वाह करणारी असल्याचे समजते. तिची ओळख अद्याप पटली नाही. पण या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
बोंबाबोंब:राहुल गांधींवर कसाबसारखा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून थेट पाकिस्तानला पाठवा, नितेश राणेंचा हल्लाबोल
भाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थेट पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्यावर मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाब सारखा देशद्रोहाचा खटला दाखल करून पाकिस्तानात पाठवण्यात यावे, असे ते म्हणालेत. ते कोल्हापुरात बोलत होते. ओबीसी समुदायाच्या नावाने चुकीचे बोलता. त्यानंतर संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यानंतर भाजपच्या नावाने बोंबा मारता, असेही ते यावेळी म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.