आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राज्यसभा खासदार:शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी पहिल्यांदाच राज्यसभेत; जाणून घ्या राजकारणात येण्यापूर्वी काय करायच्या

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज राज्यसभा सदनात राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सात जणांची निवड झाली. आज शपथ घेणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. परंतू, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे काँग्रेस नेत्या फौजिया खान शपथविधीला जाऊ शकल्या नाहीत. दरम्यान, या सात जणांपैकी  काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा झेंडा हाती धरलेल्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रियंका यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली आहे. जाणून घेऊया प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

खा. प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहे.  प्रियंका चतुर्वेदी पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. त्या काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. त्या नेहमी वृत्त वाहिन्यांवर होणाऱ्या कार्यक्रमात काँग्रेसची बाजू मांडताना दिसायच्या. परंतू, अनेक दिवसांपासून पक्षाकडून होणारे दुर्लक्ष आणि काही काँग्रेस नेत्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या हाताची साथ सोडून शिवसेनेचे शिवबंधन बांधले. 

प्रियंका आपल्या कुटुंबासमवेत
प्रियंका आपल्या कुटुंबासमवेत

प्रियंका यांचे खासगी आयुष्य

प्रियंका यांचे कुटुंब मथुरावरुन मुंबईत शिफ्ट झाले होते. त्यांचा जन्‍म 19 नोव्हेंबर 1979 ला मुंबईत झाला. जुहूच्या एका शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण घेतल्यानंतर विले पार्लेतील कॉलेजमधून कॉमर्सची डिग्री मिळवली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. प्रयास चॅरिटेबल ट्रस्‍टच्या माध्यमातून त्या दोन शाळाही चालवतात. 2010 मध्ये त्या काँग्रेसमध्ये सामील झाल्या.

यामुळे सोडली काँग्रेसची साथ

प्रियंका काँग्रेसमध्ये असताना उत्तर प्रदेशच्या मधुरामध्ये राफेल डीलबाबत एक पत्रकार परिषद घेत होत्या. यादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन केले होते, याची तक्रार प्रियंका यांनी पक्षाकडे केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पक्षाने दोषी कार्यकर्त्यांवर शुल्लक कारवाईदेखील केली, परंतू या प्रकरणामुळे नाराज प्रियंका यांनी काँग्रेसला सोडण्याचे ठरवले.

ट्विटरवरुन साधला होता निशाना

प्रियंका यांनी या प्रकरणाचा उल्लेख ट्विटरवरही केला होता. त्यांनी ट्वीट केले होते की, 'पक्षासाठी रक्ताचे पाणी करुन काम करणाऱ्यांऐवजी पक्षा मारहाण करणाऱ्या गुंडांची बाजू घेत आहे. पक्षासाठी मी गैरवर्तना आणि मारहाणही सहन केली, पण दोषींविरोधात पक्षाने काहीच कारवाई केली नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे.'

शिवसेनेत सामील झाल्यानंतर दिले होते स्पष्टीकरण

शिवसेनेत सामील होताच, तिकीट न दिल्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याच्या वृत्तांचे प्रियंका यांनी खंडन केले होते. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, माझ्यासाठी महिलेचा सन्मान मोठा आहे. पक्षातील गैरवर्तनामुळे पक्ष सोडत असल्याचे प्रियंका यांनी सांगितले होते. शिवसेनेत सामील झाल्यानंतर म्हणाल्या होत्या की, 'मी निष्ठेने पक्षाची सेवा करेल. मी आपल्या मुद्द्यांची लढाई लढत आहे. मी मुंबईची रहिवासी असल्यामुळे माझ्याकडे शिवसेनेशिवाय दुसरा उत्तम पर्याय नव्हता.' उद्धव ठाकरेंनी प्रियंका यांचे स्वागत करताना म्हटले होते की, प्रियंका यांना फक्त महाराष्ट्राची नाही, तर दुसऱ्या राज्यतील जबाबदारी देऊत.

ही आहे प्रियंका यांची दुसरी ओळख

प्रियंका चतुर्वेदी फक्त राजकारणातच सक्रीय नाहीत. राजकारणासोबतच त्या तहलका, डीएनए आणि फर्स्‍टपोस्‍टच्या स्‍तंभलेखत राहिल्या आहेत. तसेच, समाजसेवेतही त्यांचे योगदान आहे. त्या दोन एनजीओच्या संचालीकाही आहेत. मुलांचे शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि आरोग्य सेवेसाठी काम करतात. बुक रिव्ह्यूसाठी एक ब्‍लॉगही चालवतात, याची भारतातील टॉप-10 गिनती होते.