आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना रिकव्हरी रेट:कोरोना रिकव्हरी रेटमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम, तर परभणी दुसऱ्या आणि हिंगोली तिसऱ्या स्थानी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व जिल्ह्यांचा रिकव्हरी रेट राज्य शासनाच्या आरोग्यसेवा संचालनालयाने जाहीर केला

प्रवीण देशपांडे 

कोरोना आजारातून बरे होण्याच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांचा रिकव्हरी रेट राज्य शासनाच्या आरोग्यसेवा संचालनालयाने जाहीर केला असून त्यामध्ये कोल्हापूर राज्यात पहिल्या स्थानावर आहे. कोल्हापूरचा रिकव्हरी रेट 90.4 इतका आहे. परभणी दुसऱ्या स्थानवर असून परभणी चा रेट 87.5 आहे. तर, शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84. 59 टक्के असल्याने हिंगोली तिसऱ्या स्थानावर आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ अर्चना पाटील यांनी यांनी ही माहिती जाहीर केली आहे.

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट सध्या 49.5 टक्के एवढा आहे .तर देशाचा 52.7 टक्के इतका आहे. जिल्हानिहाय रेट जाहीर करण्यात आला आहे . केंद्र शासनाच्या नवीन डिस्चार्ज पॉलिसी नुसार व राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांनुसार सर्व रुग्णांच्या वर्गीकरणानुसार रुग्णांना वेळेवर डिस्चार्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाणात कोल्हापूर, परभणी, हिंगोली पाठोपाठ वर्धा 78.96, गडचिरोली 78, सिंधुदुर्ग 77.3, चंद्रपूर 75.9, अहमदनगर 74.6 उस्मानाबाद 73.9, बीड 69.9, सातारा 69.5,  यवतमाळ 69 गोंदिया 68.3 रत्नागिरी 66.7, धुळे 65 .8, भंडारा 65 पॉईंट इन बुलढाणा 65 लातूर 64 पॉईंट एक अकोला 63.5 जालना 63 पॉईंट 3 अमरावती 63 नागपूर62.9, नांदेड 62.5  आहे. सर्वात कमी असलेली जिल्हे वाशिम पालघर नंदुरबार ठाणे व सोलापूर हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...