आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील कोकण भागात सह्याद्री पर्वतरांगेतील समुद्रकिनारी गणेश मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्टे म्हणजे हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे, जेथे समुद्राच्या लाटा थेट मंदिरापर्यंत पोहोचतात. यामुळे मंदिराला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. हे मंदिर श्री क्षेत्र स्वयंभू नावाने देखील ओळखले जाते. या मंदिराचा इतिहास खूप जूना असून 3400 वर्षापूर्वीचा असल्याचे मानजे जाते. इ.स.पू. 1600 मध्ये ज्या ठिकाणी हे मंदिर होते, तिथे डोंगराखाली केवडाची बाग होती.
या मंदिराबद्दल एक जूनी आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार, त्या वेळी या परिसरात बालभटजी भिडे ब्राम्हण राहत होते. दरम्यान, मुघलांच्या काळात ते अडचणीत आले आणि त्यांनी गणेश पूजेला सुरुवात केली. गणेश प्रकट झाला. त्याच्या सूचनेनुसार, संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आणि सापडलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. शिवाजी महाराजांनीही या मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते.
मंदिराबाहेर 11 दिपमाला आहेत
कोकणातील समुद्राच्या काठी असलेल्या या मंदिराच्या बाहेर 11 दीपमाला आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे भाविकांना सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे कोरोनापूर्वी दरवर्षी गणेश चतुर्थी, पालखी प्रदक्षिणा, महापूजा केली जात होती. दरम्यान, दर्शनासाठी येथे दरवर्षी 10 हजारांहून अधिक लोक येत होते.
हा पश्चिमेचे रक्षण करणारा देव
सह्याद्री पर्वतरांगेतील समुद्रकिनारी असलेला या गावाला गणपतीपुळे म्हणतात. पूर्वी उत्तरेत येथे वस्ती होती. लोकसंख्या वाढत गेल्याने येथे गाव बनले. या गावाच्या पश्चिमेला उतार असून अनेक भागात वाळूच वाळू आहे. या यामुळे या गावाचे नाव गणपतीपुळे पडले. या गावाला पश्चिमेचा संरक्षकही म्हटले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.