आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड:कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील करमळी बोगद्यात कोसळली माती, वाहतूक ठप्प

रायगड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोकण रेल्वे - मार्ग बदल आणि रद्द गाड्या

कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यात करमाळी येथील बोगद्यामध्ये माती कोसळत असल्याने करमाळी ते थिविम दरम्यान रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून ही माती कोसळत आहे . मार्गावरील गाड्या विविध स्थानकांवर रोखण्यात आल्या आहेत. करमळी येथील बोगद्यात माती कोसळत असल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघड झाला.

ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे करमळी बोगद्यात माती कोसळल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे,असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मार्ग बदललेल्या गाड्या -
कोकण रेल्वेवर 19/07/21 सुटणारी 06345 लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस पनवेल - कर्जत -पुणे -मिरज- हुबळी- शोरणुर ह्या बदललेल्या मार्गावरून आणि पुढे नियमित मार्गावर धावेल .

रद्द गाड्या -
19/7/21 रोजी सुटणारी 01112 मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस आणि 20/ 07/21 रोजी सुटणारी 01113 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव पर्यंत धावणारी मांडवी एक्सप्रेस या गाड्या पूर्णता रद्द करण्यात आलेल्या आहेत.