आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:मृत कोरोना बाधिताच्या चितेला मुख्याधिकाऱ्यांनी दिला मुखाग्नी, सेनगाव पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचे सर्वत्र कौतुक

हिंगोली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील कवठा येथील कोविड सेंटरमध्ये एका ६० वर्षांच्या रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावली, मात्र प्रकृतीचेे कारण दाखवत मुखाग्नी देण्यासाठी येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शेलैश फडसे यांनीच पुढाकार घेऊन मृतदेहाला मुखाग्नी दिला. बुधवारी (दि.२८) हा प्रकार घडला.

सेनगाव तालुक्यातील कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेेंटर सुरू करण्यात आले. या ठिकाणी एका ६० वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळवली. मात्र सकाळपर्यंत त्यांचे कुटुंबीय आले नाहीत. त्यानंतर अंत्यसंस्काराची जबाबदारी सेनगाव नगरपंचायतीने स्वीकारली. सेनगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, गटविकास अधिकारी बेले, कर्मचारी विजय हणवते, देवदास सुतार, मिथुन सुतार, लक्ष्णम सुतार, बाळू सुतार, विनोद कांबळे यांनी कवठा येथे जाऊन अंत्यविधीची तयारी केली. त्यानंतर आज सकाळी पुन्हा त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. सकाळी आठ वाजता त्या व्यक्तीचा एक मुलगा व इतर नातेवाईक कवठा येथे हजर झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून मृतदेह नगरपंचायतीच्या ताब्यात दिला. नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कवठा येथील स्मशानभूमीत नेला. त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनीच मृतदेह सरणावर ठेवून मुखाग्नी देण्यासाठी मृतदेहाच्या नातेवाइकाला बोलावले. मात्र त्यांनी प्रकृतीचे कारण सांगत मुखाग्नी देण्यास असमर्थता दर्शवली. स्मशानभूमीत दूर अंतरावरूनच आम्ही अंतिम दर्शन घेतो असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुखाग्नी देण्यासाठी कोणीही नातेवाईक पुढे येत नसल्याने अखेर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनीच पुढाकार घेऊन मृतदेहाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पाडले.

आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले
कोविड रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडण्याची जबाबदारी नगरपंचायतीकडे देण्यात आली आहे. त्यानुसार आज त्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांना माहिती दिली. मात्र प्रकृती व घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या त्यांच्या नातेवाइकांनी मुखाग्नी देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे आम्ही मुखाग्नी देऊन आमचे कर्तव्य पार पाडले. - शैलेश फडसे, मुख्याधिकारी, सेनगाव नगरपंचायत.

बातम्या आणखी आहेत...