आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी पौर्णिमा:'नरेंद्रभाई तुम्ही देशासाठी केलेले कार्य देशातील नागरिक कधीच विसरू शकणार नाहीत'; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची पंतप्रधान मोदींना अनोखी राखी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लता मंगेशकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन राखी पौर्णिमेच्या शुभेच्य़ा दिल्या आहेत. लता दिदींनी त्यांचा आणि नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ ट्वीट करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हीच माझी राखी असल्याचेही म्हटले आहे.

आपल्यी ट्वीटमध्ये लता मंगेशकर म्हणाल्या की, 'आज राखी पोर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर मी तुम्हाला प्रणाम करते. मी आज राखी पाठवू शकले नाही. त्याचे कारण सर्व जगाला माहित आहे. नरेंद्रभाई तुम्ही देशासाठी इतके काम केले आहे की, देशातील नागरिक विसरु शकणार नाही. आज भारताच्या कोट्यावधी महिला तुम्हाला राखी बांधण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, त्यांना राखी बांधणे शक्य नाही. तुम्ही हे समजू शकता. या राखीच्या दिवशी तुम्ही वचन द्या की तुम्ही देशाला आणखी उंचीवर घेऊन जाल.'

लता मंगेशकर यांच्या या ट्विटवर पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला आहे. मोदी म्हणाले, 'लता दीदी, राखी पौर्णिमेनिमीत्त तुमचा हा भावपूर्ण संदेश खूप प्रेरणा आणि ऊर्जा देणार आहे. कोट्यावधी माता-बहिणींच्या आशिर्वादाने आपला देश सातत्याने नव्या उंचीवर जाईल. नवे यश संपादन करेल. तुम्हाला चांगले आरोग्य लाभो आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वराकडे माझी प्रार्थना.'

बातम्या आणखी आहेत...