आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:मुलीच्या सोयरिकीला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला अपघात; 2 महिलांसह चौघांचा जागीच मृत्यू, 6 वर्षीय मुलासह दोघे जखमी

लातूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीचे लग्न ठरवण्यासाठी जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारला अपघात होऊन 4 जणांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना लातूरमध्ये घडली आहे. या घटनेत एका 6 वर्षीय मुलासह 2 जण जखमी झालेत. हा अपघात एवढा भीषण होता की, इनोव्हा कार सलग 4 वेळा पलटी होत रस्त्या शेजारच्या एका शेतात जाऊन पडली.

निलंगा - औराद मार्गावरील घटना

यासंबंधीच्या वृत्तानुसार, चाकूर तालुक्यातील एक कुटुंब कारमधून औराद शहाजनीकडे सोयरीकीसाठी जात होते. पण रस्त्यात अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार 4 वेळा पलटी होऊन शेतात जाऊन पडली. निलंगा - औराद मार्गावर हा भयंकर अपघात घडला. त्यात 2 महिला व 2 पुरुष जागीच ठार झाले. तर एका 6 वर्षीय मुलासह अन्य 1 जण जखमी झाले. त्यांच्यावर निलंगा स्थित उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी उपस्थित पोलिस व नागरीक.
घटनास्थळी उपस्थित पोलिस व नागरीक.

अशी आहेत मृतांची नावे

या अपघातात भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे, लता छछभगवान सावळे व राजकुमार सुधाकर सावळे या 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मुलीचे लग्न ठरवण्यासाठी जात होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

कार शेतात अशी उलटली होती.
कार शेतात अशी उलटली होती.

समृद्धी महामार्गावरही अपघात

दुसरीकडे, अन्य एका घटनेत समृद्धी महामार्गावर मासे घेऊन घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अपघात झाला. हा ट्रक समृद्धी महामार्गावर उलटल्यानंतर घटनास्थळी माशांचा खच पडला. त्यामुळे मासे गोळा करण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर सिंदखेडराजा जवळून समृद्धी महामार्ग जातो. याच ठिकाणी हा अपघात झाला. ही घटनाही चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडल्याचे सांगितले जात आहे.

अपघाताशी संबंधित खालील वृत्त वाचा...

काळाचा घाला:रेल्वेच्या धडकेत अख्खं कुटुंब संपलं; विरार स्थानकावर पती-पत्नीसह 3 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

विरार रेल्वे स्थानकात एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांत पती-पत्नी व अवघ्या 3 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. रेल्वे रुळ ओलांडताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी मध्यरात्री घडली घटना

पोलिसांच्या माहितीनुसार, विरार स्थानकावर गुरुवारी मध्यरात्री साडे 12 ते 1 च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 दरम्यान ही घटना घडली. मेल एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. त्यात 28 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला व त्यांच्या 3 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. पुरुष व महिला हे मूळचे बिहारचे रहिवासी असून, ते मोलमजुरीचे काम करतात. सध्या त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. वसई रोड लोहमार्ग पोलिस पुढील तपास करत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी...