आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लातूर:जिल्ह्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन; पहिल्याच दिवशी विनाकारण बाहेर फिराणाऱ्यांना पोलिसांचा चोप

लातूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमिवर आज(दि.15) पासून 30 जुलैपर्यंत जिल्ह्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. आज या लॉकडाउनचा पहिलाच दिवस आहे, लॉकडाउनची अमंलबजावनी चांगली झाली. पण, शहरात अनेक ठिकाणी लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसले, या बाहेर फिराणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. 

जिल्ह्यात लॉकडाउची अंमलबजावनी चांगली झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासून पोलिस आणि प्रशासानाचे अधिकारी रस्त्यावर उतरलेले दिसले. ऐरवी गजबजलेल्या रस्त्यांवर आज मात्र शुकशुकाट होता. यादरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले. पण, काही ठिकाणी विनाकारण लोक रस्त्याने फिरताना दिसले. यांना पोलिसांकडून लाठ्यांचा प्रसाद खावा लागला.