आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायंदे यांचा फडणवीसांवर पुराव्यासह पलटवार:म्हणाल्या, 'मामू' आणखी काही बोलायला हवे का?

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबरी ढाचा पाडण्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. फडणवीसांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेनेच्या वतीने त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. भाजपच्या नेते मंडळींनी देखील आरोपांची सरबत्ती सुरू ठेवली आहे. त्यावर शिवसेना नेत्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पुराव्यासह फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.

कायंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत बाबरी ढाचा पडला त्यावेळीच्या निकालांमध्ये शिवसेना नेत्यांची नावे असल्याचा दावा केला आहे. यामध्ये शिवसेनेच्या चार नेत्यांची नावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या म्हणाल्या की, 'बाबरी मशीद ध्वस्त केल्याने ज्यांच्यावर गुन्हे आणि खटले दाखल झाले होते, त्यातील शिवसेना नेत्यांची नावे बघा. मामू, आणखी काही बोलायला हवे का? उचलली जीभ आणि.... खोटे बोल पण रेटून बोल..'

नेमका काय आहे वाद

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत शिवसेनेचा एकही नेता बाबरी ढाचा उध्वस्त झाला त्यावेळी उपस्थित नसल्याचा दावा केला होता. तर आपण स्वतः मात्र तेथे उपस्थित असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला होता. यावरून शिवसेनेने पलटवार करत त्यावेळी तुम्ही लहान होतात, असा आरोप केला होता. त्यालाही उत्तर देत आपण त्या वेळी नगरसेवक असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. आता मनीषा कायंदे यांनी पुराव्यासह शिवसेना नेते सदरील ठिकाणी उपस्थित होते, असा दावा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...