आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Legislative Council Elections। Sanjay Kenekar From BJP Filed Nomination Papers For The Legislative Council, While Pragya Satav From Congress Declared His Candidature

विधान परिषद निवडणूक:भाजपकडून संजय केणेकर यांनी भरला विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज, तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानपरिषद निवडणुकीसाठी आज भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक अधिकारी यांच्याकडे विधानभवन येथे त्यांनी आपला उमेदवारी दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर उपस्थित होते.

काँग्रेसकडून देखील विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आज याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

काँग्रेसने विधानपरिषदेच्या एका जागेसाठी ही उमेदवारी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. जुलै 2024 पर्यंत विधानपरिषदेची मुदत असून, राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे. दुसरीकडे या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती.

येत्या 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेची रिक्त जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 16 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाले होते.

त्यानंतर त्यांच्याजागी रजनी पाटील यांना पाठवण्यात आले होते. त्यावेळी प्रज्ञा सातव यांना राज्यसभेत पाठवण्याची चर्चा सुरू होती, मात्र त्यांच्या जागी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आता काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...