आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इम्पॅक्ट:‘दारू बंद’च्या निर्धाराने बाटली आडवी! शालेय मुलेही व्यसनाच्या आहारी गेल्याने नायगाव होते चर्चेत

नांदेड / शरद काटकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड : धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध.) येथे शुक्रवारी दारूबंदीसाठी इन कॅमेरा ग्रामसभा घेण्यात आली.

दारूच्या व्यसनाने घेरलेल्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध.) मध्ये अखेर बाटली आडवी झाली असून ग्रामसभेने दारूबंदीचा ठराव मंजूर केला. चाैथीची मुले १०-१० रुपये जमवून दारू पीत असल्याने गावातील त्रस्त महिलांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर हे गाव खूप चर्चेत आले. पण शुक्रवारी ११ वाजता ठराव मंजूर झाल्यानंतर महिलांच्या आंदोलनाला यश आले. “दारू बंद, दारू बंद’च्या घोषणांनी गावचा परिसर दणाणून गेला होता.

महिलांच्या दारूबंदीच्या मागणीचा “दिव्य मराठी’ने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शुक्रवारी कोरोना नियमांचे पालन करत इन कॅमेरा ३७४ महिलांच्या स्वाक्षऱ्या करत हात उंचावून हा ठराव मंजूर केला. गावात महिलांची संख्या ६३२ आहे. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री सातपर्यंत चालली. गावातील दारूच्या दुकानामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी खडसावल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी शुक्रवारी महिलांच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. महिलांनी घरातील कामे पटापट आटोपून त्या ग्रामपंचायत परिसरात उभारण्यात आलेल्या सभामंडपामध्ये हजर होत होत्या. मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम या वेळी पाळण्यात आले. ग्रामसभेत ठराव घेतल्यानंतर महिलांचे मतदान ओळखपत्र घेऊन स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. दारूचे दुकान सुरू ठेवण्याच्या बाजूने एकही मत पडले नाही. या वेळी महिलांचा उत्साह ओसांडून वाहत होता. यावेळी सरपंच नागेंद्र सुर्यकार यांच्या अध्यक्ष व सचिव ग्रामसेवक एस. एस. जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सूचक सुनीता संजय राजपोड यांनी दारुबंदीचा ठराव मांडला. तर लक्ष्मीबाई सूर्यकार यांनी अनुमोदक दिले. यावेळी तहसीलदार यांचे प्रतिनिधी यू. डब्ल्यू. आढे, गटविकास विस्तार अधिकारी आर.डी.जाधव, पोलिस उपनिरिक्षक व्ही.एन. कराड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक पी.बी. टकलेे, एम.यू. अकांडे उपस्थित होते.

दरम्यान, गावातील बचत गट सदस्या लक्ष्मीबाई सूर्यकार म्हणाल्या की, दारूबंदीसाठी महिला आठ तास बसून होत्या. महिलांचा विजय झाला आहे. दारूबंदीमुळे सर्वांचे संसार वाचले आहेत. गावातील व्यासनाधीनता नाहीशी होईल.

मेहनतीचे मिळाले फळ
तीन महिने सातत्याने दिवस-रात्र एक करून महिलांना एकत्र केले. आमच्या लढ्याला यश आले आहे. महिला आनंदात आहेत. मेहनतीचे फळ मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले आहे. आता प्रत्यक्षात दारूचे दुकान जेव्हा बंद होईल तो दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा राहील. - सुनीता संजय राजपोड, आयसीआरपी, ग्रामज्योती ग्रामसंघ, नायगाव (ध.)

बातम्या आणखी आहेत...