आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोधमोहीम:राज्यातील बोगस डॉक्टरांची यादी जाहीर करणार : मंत्री अमित देशमुख

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. परिणामी रुग्णांना जीव गमवावा लागतो आहे. हा मुद्दा गंभीर बनला असून बोगस डॉक्टरांवर सरकार कारवाईची मोहीम हाती घेणार आहे. त्यासाठी महिनाभर बोगस डॉक्टरांची शोधमोहीम हाती घेतली जाईल. बोगस डॉक्टरांची यादी जाहीर केली जाईल. ग्रामीण भागात डॉक्टरांना नोंदणी सक्तीची करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी (१० मार्च) विधान परिषदेत दिली.

मुरबाड येथील बोगस डॉक्टरांमुळे निष्पाप पाच लोकांना जीव गमावावा लागला, त्याप्रकरणी शिवसेना सदस्य विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधान परिषदेचे लक्ष वेधले. दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत आहे. शासनाने यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षण शोध मोहिम येत्या महिनाभरात हाती घेऊ.

बातम्या आणखी आहेत...