आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धा:तळीरामांनी शौक पूर्ण करण्यासाठी केली दारुची चोरी, राज्य उत्पादन शुल्काने जप्त केलेल्या दारूवर मारला डल्ला

वर्धा3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • तळीरामांनी 63 हजारांच्या शासनाच्या दारुवर मारला डल्ला, चौघांना घेतले ताब्यात

लॉकडाऊनची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असल्याने, तळीरामांनी शौक पूर्ण करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची जप्तीची दारु चोरतांना चौघांना शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने कारंजा महामार्गावर दिनांक 10 ऑगस्ट रोजी 63 लाख रुपयांची विदेशी दारु पकडली होती. पकडण्यात आलेले दारुचा साठा नष्ट करण्यासाठी न्यायालय प्रक्रिया सुरु असल्याने, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दारुच्या पेट्या आरती चौक येथे असलेल्या कार्यालयाच्या मालखण्यात ठेवल्या होत्या. दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे शिपाई हरिदास श्रावण सुरजूसे ड्युटीवर असता वेळेस शहरातील चौघांनी मालखण्याचे दार उघडून विदेशी दारु चोरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिपाई यांनी शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तपासणी केली असता, निलेश छोटेलाल फुलहार रा रामनगर, मनोज महादेव उईके रा गजानन नगर, सुनील उर्फ नागसेन ईश्वर वनकर रा गाडगेनगर म्हसाळा, बबलू उर्फ रविकांत जयप्रकाश ठाकूर रा रवी नगर म्हसाळा या चौघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून 60 हजार 600 रुपयांची विदेशी दारु, मोटर सायकल क्रमांक एम एच 32 ए बी 6935 व एम एच 32 जी 9970 किंमत 70 हजार रुपये असा एकूण 1 लाख 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यय निरीक्षक शाहू दत्तात्रे घुले यांच्या तक्रारी वरुन शहर पोलिसांनी कलम 457, 380  भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांचे मार्गदर्शनात दत्तात्रे ठोबंरे करीत आहे. लॉकडाऊन परिस्थितीत सर्व अवैध धंदे पोलिसांकडून बंद करण्यात आले असूनही, तळीरामांचे शौक पूर्ण व्हावे याकरिता नवनवीन शक्कल लढवली जात आहे. याचाच प्रकार वर्धेत घडला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...