आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाउनचा परिणाम:शेतकऱ्याने कोबीच्या पिकात सोडली जनावरे, वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने घेतला निर्णय

हिंगोली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे

औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथील शेतकऱ्याने लॉकडाऊन मुळे भाजीपाला विक्रीसाठी नेता येत नसल्यामुळे तसेच बाजारात भाजी नेण्याचा खर्चही परवडत नसल्याने शनिवारी ता. 11 कोबीच्या पिकात जनावरे सोडून दिली. विशेष म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे देखील या शेतात सोडण्यात आली आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथील शेतकरी शेषराव भिमराव सावळे हे मागील पाच ते सहा वर्षापासून कोबीचे पिक घेतात. त्यांच्याकडे सर्वे नंबर 188 मध्ये दहा एकर शेत असून त्यापैकी दरवर्षी दोन एकर क्षेत्रावर कोबीचे पिक घेतात. जून महिन्यात लावण्यात आलेले कोबीचे पिक बारा महिने चालते. सदरील पिक हिंगोली, औंढा नागनाथ व जवळाबाजार येथील बाजारपेठेत विक्री केले जाते. कोबीचा एक हंगाम तीन महिन्याचा असून एका हंगामात बाजारातील दरानुसार या पिकातून सरासरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते.

यावर्षीही त्यांनी एक एकर शेतामधे कोबीचे पिक घेतले आहे. सध्या हे पिक काढण्यासाठी आले होते. मात्र कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असून दोन ते तीन दिवस आड करून भाजीपाला विक्रीला परवानगी दिली जात आहे. मात्र यामध्येही केवळ चार तासच भाजीपाला विक्रीची परवानगी मिळत आहे. या चार तासात किती भाजी विक्री होणार तसेच बाजारपेठेत केवळ चार ते पाच रुपये किलो कोबी विक्री होत असल्याने काढणी व वाहतुकीचा खर्चही निघेणासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेषराव भिमराव सावळे यांनी कोबीच्या पिकात जनावरे चारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज त्यांनी त्यांची स्वतःची तसेच शेजाऱ्यांची जनावरे देखील कोबीच्या पिकात सोडून दिली आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनीही त्यांच्या मालकीची जनावरे या ठिकाणी चारण्यासाठी आणली आहेत. त्यामुळे जनावरांच्या खाद्याचा प्रश्‍न सुटला आहे.

एक लाख रुपयांचे नुकसान : शेषराव भिमराव  सावळे, शेतकर

यावेळी कोबीचे पिक काढणीसाठी आले होते. मात्र बाजारपेठेत चार ते पाच रुपये किलो भाव मिळू  लागला आहे. तर लॉकडाऊन मुळे वाहन चालक येण्यास तयार नाही शिवाय कोणी आलेच तर वाहतुकीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळेच पिकांमध्ये जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामधे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...