आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खुलासा:...तर यामुळे लोणार सरोवराचे पाणी झाले होते गुलाबी, खरे कारण आले समोर

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी गुलाबी झाले होते. पाणी गुलाबी झाल्यानंतर सर्वत्र याच विषयाची चर्चा होती. याबाबत अनेकांनी तर्क-वितर्क लावले होते. पण, आता पाणी गुलाबी होण्यामागचे खरे कारण समोर आले आहे. ‘हालोआर्चिया’ नावाच्या विषाणूमुळे पाणी गुलाबी झाल्याचे समोर आले आहे. हा खुलासा पुण्यातील आगरकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत धाकेफाल्कर यांनी केला आहे.

डॉ. प्रशांत धाकेफाल्कर यांनी सांगितले की, ‘हालोआर्चिया’ किंवा ‘हालोफिलिक आर्चिया’ विषाणू खाऱ्या पाण्यात सापडला जातो. हा विषाणू गुलाबी रंग तयार करतो, यामुळे सरोवराचे पाणी गुलाबी झाले होते.

डॉ. प्रशांत पुढे म्हणाले की, "सुरुवातीला आम्हाला वाटले होते की, लाल रंगाच्या दुनालीला शेवाळ्यामुळे पाणी गुलाबी झाले आहे, पण सरोवरातील पाण्याचे परीक्षण केल्यानंतर आम्हाला समजले की, पाणी हालोआर्चियामुळे पाणी गुलाबी झाले आहे."

हायकोर्टात सादर केली रिपोर्ट

संस्थेच्या संशोधकांनी याप्रकरणाची सखोल रिपोर्ट वन विभागाला पाठवली, त्या रिपोर्टला वन विभागाने मुंबई उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केली आहे.

पाऊस न पडल्यामुळे विषाणू वाढले

डॉ. प्रशांत म्हणाले की, पाऊस न पडल्यामुळे, मानवी हस्तक्षेप न झाल्यामुळे आणि उन्हामुळे बाष्पीभवन झाल्यामुले पाण्याचा खारेपणा आणि पीएच स्तर वाढला. हे वातावरण हालोआर्चियाची वाढ होण्यासाठी चांगले असते. पाऊस पडल्यानंतर सरोवराचे पाणी पुन्हा आपल्या मुळ रुपात येईल.