आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सर्वस्वी राज्य सरकारचे फेल्यूअर असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने दोन वर्षे टाईमपास केला असा आरोपही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका दोन आठवड्यात जाहीर कराव्या लागणार आहेत. त्यावर ते माध्यमांशी बोलत होते.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करत निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 25 एप्रिल रोजी या संदर्भातली सुनावणी झाली होती. यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच निवडणूक आयोगाला आगामी दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
काय म्हणाले फडणवीस
5 वर्षे पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक नेमता येत नाही. संविधानामध्येच तशी तरतूद करण्यात आलेली आहे. अशा सर्व ठिकाणी तात्काळ निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हा निकाल म्हणजे राज्य सरकारचे फेल्यूअर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
OBC समाजाची अपरिमित हानी
केली दोन वर्ष राज्य सरकारने टाइमपास केला. या कालावधीत निकष पूर्ण केले नाही. राज्य सरकारने निकष पूर्ण केले असते तर ओबीसी समाजाचे नुकसान झाले नसते, असे देखील फडणवीस म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले. या सर्व प्रकरणामुळे ओबीसी समाजाची अपरिमित हानी झाली आहे. या हानीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे देखील ते म्हणाले. सरकारने यासंदर्भात योग्य प्रकारची भूमिका कधीच मांडली नाही, जी कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई देखील केली नसल्याचे ते म्हणाले.
निकाल समजून घेतल्यानंतर भूमिका स्पष्ट करू
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊ आणि त्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे फडणवीस यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.