आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारत्नागिरी जिल्हामधील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने यामध्ये 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, संबंधित घटनामध्ये आणखी काही लोकांचा मृत्यू होण्याची शंका स्थानिक प्रशासनकडून वर्तवली जात आहे. आतापर्यंत यात 4 कामगार मृत्यूमुखी पडले असून 50 गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांना तातडीने रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस प्रशासन आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल झाले.
बॉयलरमध्ये स्फोट झाल्यावर आग लागली
फायर ब्रिगेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये मोठा स्फोट निर्माण झाल्यावर आग लागली. त्यामुळे कंपनीत काम करणारे मोठ्या प्रमाणातील कामगार आगीच्या कचाट्यात सापडले. गंभीर जखमी झालेल्या कामगारांवर रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
स्फोटाचा आवाज 5 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला
कंपनीच्या आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या लोकांनी सांगितले की, या स्फोटाची तीव्रता ऐवढी जास्त होती की याचा आवाज 5 किमी पर्यंत राहणाऱ्या लोकांना ऐकू गेला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 8 गाड्या कार्यरत आहे.
9 दिवसांपूर्वी ठाण्यातील एका कंपनीत लागली होती आग
महाराष्ट्रातील ठाणे जिल्हातील अंबरनाथ एमआयडीसीत 9 दिवसांपूर्वी अशाच प्रकारची आग लागली होती. आग एवढी भयंकर होती की, आगीने कमी वेळात पूर्ण एमआयडीसीला आपल्या कवेत घेतले होते. मात्र सुदैवाने यात कोणत्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.