आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:गुंडलवाडी शिवारात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, एकाच दोरीने घेतला गळफास

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलीचे ठरले होते लग्न, यानंतर प्रियकरानंतर संपवले जीवन

कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी शिवारात प्रेमीयुगुलाने शेतात एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ता. 9 सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. अजय केशव डुकरे (16) व सरस्वती कऱ्हाळे (18) अशी त्यांची नावे असल्याचे सुत्रांनी सांगितले.

या संदर्भात गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथील अजय केशव डुकरे यांच्या शेतात हळदीच्या पिकाची काढणी सुरु आहे. त्यामुळे शेतात रात्रीच्या वेळी जागरण करण्यासाठी जावे लागते. त्यानुसार गुरुवारी ता. 8 रात्री 10 वाजता अजय घरी जेवण करून शेतात जागरण करण्यासाठी जातो असे सांगून शेतात गेला. तो नेहमीच शेतात जात असल्याने घराच्या मंडळींनीही त्याला परवानगी दिली.

दरम्यान, आज सकाळी काही शेतकरी शेतात जात असतांना केशव डुकरे यांच्या शेतात एका झाडाला एक मुलगा व एका मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आला. सदर प्रकार गावात कळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांनी पाहणी केली असता अजय डुकरे व सरस्वती कऱ्हाळे या दोघांचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुडेकर, जमादार भगवान वडकिले यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत.

दरम्यान, मयत अजय डुकरे हा परभणी येथील सैनिकी शाळेत इयत्ता बारावी वर्गात शिक्षण घेत होता. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मागील काही दिवसांपासून तो घरीच होता. तर सरस्वती कऱ्हाळे यांचे वडिल गावातच सालदार म्हणून काम करतात. तर सरस्वती कऱ्हाळे यांचा विवाह ठरला होता. त्यासाठी तिचे कुटुंबिय आज त्यांच्या मुळगाव औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी येथे जाणार होते. त्या ठिकाणी राहून लग्नाची तयारी करणार होते. मात्र त्यापुर्वीच हा प्रकार घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...