आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Corona News And Updates; Lockdown Has Not Been Decided Yet, But The State Is Moving In The Same Direction Rajesh Tope

लॉकडाउन लागणार?:लॉकडाउन लावल्यास अनेकांच्या रोजगाराची समस्या उद्भवते, परिणामी आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला -आरोग्य मंत्री

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनचा अद्याप निर्णय नाही, पण राज्याची वाटचाल त्याच दिशेने- राजेश टोपे

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात महाराष्ट्र सर्वात पुढे असून, राज्यात लॉकडाऊन लागणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनबाबत मोठे विधान केले आहे.

यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सध्या तरी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, त्या दिशेनेच वाटचाल सुरू आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे आहे, असे टोपे म्हणाले. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले.

टापे पुढे म्हणाले की, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल. राज्यातील लोक 15 दिवस गर्दीच्या ठिकाणी गेलेच नाहीत तर कोरोनाची साखळी तुटू शकते. मात्र, त्यामुळे अनेकांच्या रोजगाराची समस्या उद्भवते. परिणामी आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असेही टोपे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...