आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात वाढत चाललेला कोरोना संसर्ग रविवारीही कायम होता. प्रशासकीय पातळीवर हा संसर्ग थोपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी कोरोना रुग्णांची संख्या मात्र अजूनही आटोक्यात आलेली नाही. संसर्गाच्या नव्या लाटेत रविवारी विक्रमी ४०,४१४ रुग्ण आढळले, तर १०८ जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्युदर २% झाला असून रविवारी १७,८७४ रुग्ण बरे होऊन परतले. हा रिकव्हरी रेट ८५.९५% झाला आहे.
एकूण आकडेवारी पाहता राज्यात एकूण २७,१३,८७५ नमुने पॉझिटिव्ह आले असून १५,५६,४७६ होम क्वॉरंटाइन आहेत.
नांदेड जिल्ह्यात १३१० पॉझिटिव्ह, एका दिवसात १८ मृत्यू
औरंगाबाद | रविवारी मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा वगळता ४२ जणांचा मृत्यू झाला. यात नांदेड जिल्ह्यातील १८ जणांचा समावेश आहे, तर ३५०६ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यात नांदेड जिल्ह्यातील १३१० जणांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात ४७४ अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ६ जणांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात २८४ अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ३ जणांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात ८० अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १ जणाचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात ४९० अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ४ जणांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात १३१० अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १८ जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात १८४ अहवाल पॉझिटिव्ह आले. परभणी जिल्ह्यात ६८४ अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १० जणांचा मृत्यू झाला.
विदर्भात ८६ मृत्यू, ७४६७ नवे रुग्ण
अमरावती | विदर्भात रविवारी कोरोनामुळे तब्बल ८६ जणांचा मृत्यू झाला, तर ७४६७ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील ६४ जणांमध्ये नागपूरचे ५८, तर चंद्रपूर ३, भंडारा २, तर वर्धा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. तसेच पश्चिम विदर्भात कोरोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला. यात यवतमाळ ९, बुलडाणा ५, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी ३, तर वाशीम जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
नागपूर विभागात रविवारी ५२७३, तर अमरावती विभागात २१९४ नवे रुग्ण आढळले. विदर्भातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ५७८ वर पोहोचली, तर मृतांची एकूण संख्या ८५९१ झाली. आतापर्यंत ३ लाख ८८ हजार ४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर रविवारी ६४०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक ७३५, तर यवतमाळ ४००, अकोला ३७६, अमरावती ३४६, तर वाशीम जिल्ह्यात ३३७ नवे रुग्ण आढळले. अातापर्यंत विभागात एकूण २१६० बाधितांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या १ लाख ५३ हजार ९१९ झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.