आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमावली:राज्यात 22 ऑक्टोबरपासून उघडणार ​​​​​​​सिनेमा हॉल आणि नाट्यगृहे; सरकारकडून​​​​​​​ नियमावली जारी

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील 22 ऑक्टोबरपासून चित्रपटग्रहे आणि नाट्यगृहे उघडण्याची परवानगी दिली होती. आज 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे.

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यासाठी काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याअंतर्गत थिएटरच्या आत सामाजिक अंतरांची काळजी घेणे, फेस मास्क घालणे अनिवार्य असले पाहिजे आणि थिएटरमध्ये सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.

सर्व कलाकारांनी स्वतःच्या आरोग्याची स्वतःच देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत क्रमांकांवर (हेल्पलाईन) कळवावे.

अशी आहे नियमावली

  • ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही.
  • प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी नाही.
  • जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.
  • कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.
  • मास्क, सॅनिटायजरचा वापर आवश्यक.
  • प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.
  • आरोग्यसेतू अ‍ॅप बंधनकारक.
  • कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
  • आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
बातम्या आणखी आहेत...