आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांनी वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरेंसह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, ओरिसा मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रचे उपमुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री बंगालचे मुख्य सचिव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान उपस्थित होते. या बैठकीवर फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'महाराष्ट्रात गडचिरोली माओवाद क्षेत्र कमी होत आहे. पण शहरी नक्षलवाद मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे, महाराष्ट्र सरकारने 1200 कोटींची केंद्राकडे केलेली मागणी ती योग्य आहे, असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या मागणीचे पहिल्यांदाच स्वागत केले आहे.
नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्यातील परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागात कराव्या लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च याबाबत गृहमंत्र्यांना आकडेवारी सांगितली.
मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्ता भागांत शाळा जास्तीत जास्त कशा वाढवता येतील, त्या भागांत सुरक्षा आणि पोलीस यंत्रणांना काम करताना अनेकदा नेटवर्कच्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यासाठी या भागांत जास्तीत जास्त मोबाईल टॉवर्स उभरण्याची गरज असल्याचे सांगितले. या दोन गोष्टींमुळे या भागांत खूप उपलब्धता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.