आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखीमपूर खेरी घटनेचा निषेध:11 ऑक्टोबर रोजी ​​​​​​​महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र बंद'ची हाक; बंददरम्यान अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीने सोमवार 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

लखीमपूरमध्ये शेतकरी शांततापुर्वक काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. मात्र, केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन मोठा नरसंहार झाला. याविरोधात केंद्र सरकारने अद्याप कारवाई केली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आणि घटनेचा निषेध म्हणून सोमवारी बंद पुकारला आहे. या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा पाठींबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

बंदमध्ये महाविकासआघाडीतील तिन्हीही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार
या बंदमध्ये महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत. अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली. या मुद्द्यावर देशातील जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात येणार आहे. तसंच या बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे, असेही ते म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले - लखीमपूरमध्ये इतका मोठा गुन्हा घडूनही पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत. शेतकऱ्याची हत्या करणारा मंत्र्याचा मुलगा फरार आहे. शेतकरी आंदोलनाला वर्ष लोटले तरी केंद्र सरकार त्यांच्याशी संवाद साधत नसून त्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हटले जात आहे. भाजप शेतकऱ्यांचे हित पाहणारा पक्ष नसून तो शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे. आता तर भाजप शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही नवाब मलिक यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...